Posts

लोकगीते - 2

  मागील ब्लाॅगमध्ये आपण सर्व सणांची माहिती सांगणारे एक लोकगीत पाहिले. या लेखात ग्रामीण स्त्रीयांचे काही खेळ व खेळगीते पाहुया.ग्रामीण भागामध्ये सणावाराच्या निमित्ताने अनेक महिला एकत्र येत असत आणि थोड्या वेळाचा विरंगुळा किंवा करमणूक म्हणून फुगडी,दंड फुगडी, झिम्मा,पिंगा,कोंबडा,फेर यासारखे खेळ खेळत असत.या महिला जरी आडाणी -अशिक्षीत असल्या तरी त्यांची प्रतीभाशक्ती मात्र वाखाणण्यासारखी होती. प्रत्येक खेळ खेळताना या महिला मोठी गमतीदार गाणी म्हणत असत.गाण्यातून एकमेकींची चेष्टाही करत असत.फुगडी हा या महिलांचा अत्यंत आवडता खेळ.एकमेकींच्या हातात हातात हात गुंफून फुगडी सुरू होते.दोन्ही फुगडी खेळणा-या महिला फुगडीला जोर यावा म्हणून फुगडी सुरू करताना दोन ओळींचे गाणे म्हणतात- लेप बाई लेप,चंदनाचा लेप माझ्याबरोबर फुगडी खेळेल ती गुळाची ढेप ! खुर्ची बाई खुर्ची,वेताची खुर्ची माझ्याबरोबर फुगडी खेळेल ती लवंगी मीरची ! आम्ही दोघी मैत्रीणी जोडीच्या जोडीच्या हातात पाटल्या तोडीच्या तोडीच्या ! आम्ही दोघी मैत्रीणी वांग्यात ग वांग्यात ग फोटो काढू टांग्यात ग टांग्यात ग ! कळशी बाई कळशी,चांदीची कळशी बसलेल

लोकगीते -4

                     लोकगीते - 4        लोकगीतांची गोडी मोठी अवीट असते.साधी बोली भाषा,सुश्राव्य रचना,रचनेत अनेकांचा सहभाग,लयबद्धता,तालबद्धता,गेयता अशा अनेक वैशिष्ट्यांनी सजलेली ही लोकगीते ग्रामीण स्त्रीया एकत्र येवून म्हणू लागल्या की नुसते ऐकत रहावे.मी स्वतःला मोठी भाग्यवान समजते की हे लोकवैभव अनुभवण्याचे भाग्य मला लाभले.इतरांनाही त्याचा आस्वाद घेता यावा यासाठी हा लेखनप्रपंच.या लेखातून आणखी काही लोकगीतांची माहिती पाहुया -                                      काठवटी काना             'काठवटी काना' हा एक मोठा कौशल्यपूर्ण खेळ. (याला कदाचित वेगळे काही नावही असू शकते) हा खेळ फक्त कुशल महिलाच खेळू शकतात.हा खेळ म्हणजे 'सबके बस की बात नही!'             मांडी घालून बसायचे.दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे धरायचे आणि थोडे मागे रेलून कंबरेवर भार घेवून गोल गोल फिरायचे.फीरता फीरता गाणे म्हणायचे -                  काठवटी काना, काठवटी काना     म्हशी गेल्या राना,म्हशी गेल्या राना     म्हशी कधी यायच्या,म्हशी कधी यायच्या     दूध कधी द्यायच्या,दूध कधी द्यायच्या     काळ्या पाठ

लोकगीते- 3

                                          दंडफुगडी    ग्रामीण भागात खेळला जाणारा फुगडीचाच एक प्रकार म्हणजे दंडफुगडी.एकमेकींच्या हातात हात गुंफण्याऐवजी एकमेकींच्या दंडाला धरून फुगडीसारखेच गोल गोल फीरत ही फुगडी खेळली जाते.ही फुगडी खेळताना एक खुप छान गाणे म्हटले जाते - दंडावरून जाईन ग,पाच पाने खाईन ग दस-याला बोली केली,दिवाळीला येईन ग!       दंडफुगडी दंडाची,बाईल माझ्या दिराची       असा दीर नटुका नटुका,खोब-याचा कटुका कटुका! असे खोबरे गोड ग गोड ग,जीभेला आला फोड ग फोड ग फोड काही फुटेना फुटेना,दारचा मामा उठेना उठेना !      दारच्या मामाच्या हाती,चितरकाठी चितरकाठी      दैत्य लागला माझ्या पाठी,दैत्य माझा लेक ग लेक ग! कमळी माझी सून ग,कमळे कमळे दिवा लाव दिवा लाव दिवा गेला वा-याने वा-याने,कमळी नेली चोराने चोराने!      चोराच्या हातून सुटली सुटली,बाजेखाली लपली लपली      सासूबाईंनी देखली देखली,मामंजींनी ठोकली ठोकली!  अशी एका विशिष्ट चालीत गुंफलेली लोकगीते हे आजही ग्रामीण भागातील स्त्रीयांचे मोठे वैभव आहे. काही हौशी आणि गोड गळ्याच्या स्त्रियांमुळे हे वैभव अजुनही टिकून आहें            

लोकगीते -1

मराठी साहित्याची दोन मुख्य अंगे म्हणजे - 1)लिखीत साहित्य 2) मौखिक साहित्य लिखीत साहित्य म्हणजे लेखनाच्या विविध प्रकारांतून वाचनाच्या रूपाने आपल्यासमोर येणारे साहित्य,जसे की-पुस्तके,ग्रंथ,मासिके,नियतकालिके,वृत्तपत्रे इ. आणि मौखिक साहित्य म्हणजे मौखिक रूपाने एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संक्रमित झालेले साहित्य.जसे की-लोककथा, दंतकथा,लोकगीते, दैवतकथा,आख्यायिका इ. यात लोकगीतांचे दालन अतिशय समृद्ध आहे.पूर्वी सणासमारंभाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या महिला आपल्या भावभावना गाण्यातून व्यक्त करत असत.पण कोणी एकच स्त्री हे गाणे म्हणत नसे तर प्रत्येक महिला आपआपल्या परिने यात भर घालत असे व हे गाणे उत्तरोत्तर रंगत जाई.म्हणूनच लोकसाहित्याचा किंवा लोकगीताचा रचनाकार कुणी एक नसून अनेक असत. लोकसाहित्यातील लोकगीते हा मोठाच मनोरंजक आणि गतकाळातील लोकांच्या समृद्ध प्रतीभा क्षमतेचा परिचय देणारा भाग आहे.ही लोकगीते अतिशय सुश्राव्य,मनोरंजक आणि प्रसंगी तीतकीच उद्बोधकही आहेत. या ब्लाॅगच्या माध्यमातून काही लोकगीतांचा आनंद आपण घेणार आहोत.     आजच्या पहिल्या लेखात असे लोकगीत जे एकाच गीतात सर्व सणांची क्रमाने म